आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:भरपाईसाठी आडसकरांनी घेतली पालकमंत्र्याची भेट ; शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी

धारूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर वडवणी तालुक्यात खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले असून भाजप नेते रमेश आडसकर यांनी पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन निवेदन देत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी लावून धरली आहे.

धारूर- वडवणी तालुक्यामध्ये खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टी झाल्याने पीके वाया गेली. यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला. काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या. शेतकऱ्याला शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असताना धारूर व वडवणी तालुक्यातील २३०५ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरविले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अपात्र ठरवून फक्त २३०५ शेतकरी पात्र ठरवले आहेत त्यामुळे बाकीचे शेतकरी प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे राहिलेल्या सर्वच शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदान देऊन दिलासा द्यावा यासाठी भाजप नेते रमेश आडसकर यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना शेतकऱ्याचे अनुदान तात्काळ वर्ग करून शंभर टक्के अनुदान द्यावे यासाठी निवेदन देऊन मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...