आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पब्जीचे व्यसन, शाळकरी मुलाने केली आत्महत्या

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पब्जीच्या अति व्यसनातून १५ वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कृष्णा परमेश्वर साळवे असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. तो आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता. वडील ऊसतोडणीला गेल्याने आई व तोच घरी होते. तीन दिवसांपूर्वी तो शाळेच्या सहलीला गेला होता. शुक्रवारी पहाटे सहलीवरून परत आला व सकाळी त्याने दरवाजाला कडी लावून कपड्याच्या चिंध्यांनी गळफास घेतला.

बातम्या आणखी आहेत...