आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित्र मंजूर:कुंबेफळ उपकेंद्रासाठी अतिरिक्त रोहित्र मंजूर

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील कुंबेफळच्या उपकेंद्रातील सध्याच्या रोहित्रावर प्रचंड ताण वाढल्याने विद्युत पुरवठ्यात विस्कळितपणा येत आहे. शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश आले असून ९६ लाखांचे अतिरिक्त रोहित्र मंजूर करण्यात आल्याने २० गावातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मिटणार आहे.

कुंबेफळ उपकेंद्रावर जवळपास २० गावे अवलंबून आहेत. विजेची मागणी वाढल्याने या उपकेंद्रातील रोहित्रावर ताण पडून कमी व्होल्टेज मिळणे, ट्रीप होण्याचे प्रकार वाढले होते. विस्कळीत विद्युत पुरवठ्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिरिक्त ५ एमव्हीएचे रोहित्र द्यावे अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी सातत्याने लावून धरली होती. प्रशासकीय पातळीवर आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून आ. मुंदडा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

बातम्या आणखी आहेत...