आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार:अपर अधीक्षक पांडकर यांनी स्वीकारला पदभार

बीड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून सचिन पांडकर यांनी गुरुवारी पदभार स्विकारला. जनतेशी संवाद ठेऊन पोलिस प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी आणि आपल्या विभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पांडकर यांनी पदभार घेतल्यानंतर सांगितले.

अपर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांची दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद ग्रामीण येथे अपर पोलिस अधीक्षकपदी बदली झाली तर, त्यांच्या जागी मुंबईतील मानवीहक्क अभियानचे पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी लांजेवार यांनी बीड येथील पदभार सोडला. गुरुवारी सचिन पांडकर यांनी पदभार स्विकारला.

बातम्या आणखी आहेत...