आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौरा:आदित्य ठाकरे उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर, अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पर्यावरणमंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा जिल्हा दौरा निश्चित झाला असून मंगळवारी (८ नोव्हेंबर) जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.

आदित्य ठाकरे ८ नोव्हेंबर रोजी गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे दुपारी एक वाजता अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते चौसाळा बाजार तळावर दुपारी पावणेदोन वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. संवादाच्या कार्यक्रमाला चौसाळा येथे शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...