आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समायोजन:दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन; शिक्षक भारती संघटनेच्या मागणीला यश

गेवराई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील आयुक्तालय स्तरावरुन बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन करा अशी मागणी सातत्याने मंत्री महोदय तसेच दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने होत होती संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर त्या मागणीला यश आले.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय स्तरावर राज्यातील बंद पडलेल्या दिव्यांगाच्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.मा.आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश कायम ठेवण्यात आलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे कर्मचारी बांधवांनी आभार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...