आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव १ जानेवारी २०२३ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यानच्या तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्या ठिकाणी आत्ता प्रशासकराज आले आहे. या गावातील गाव पुढाऱ्यांना निवडणुका केव्हा जाहीर होणार यांची उत्सुकता लागली आहे माजलगाव तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात नुकत्याच मागील महिन्यात पार पडल्या.
जनतेतून सरपंच असल्याने मोठ्या चुरशी गावागावात पाहायला मिळाल्या. आत्ता तालुक्यात दुसऱ्या टप्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी या ३४ ग्रामपंचायतीवर प्रशासक राज मात्र आले आहे.
यामध्ये, लोणगाव, लऊळ, खतगव्हाण, साळेगाव,सरवर पिंपळगाव, निपाणी टाकळी, वारोळा, तालखेड, सावरगाव, हारकी निमगाव, सांडस चिंचोली, केसापुरी, शेलापुरी, मंगरूळ, पुरुषोत्तमपुरी, मंजरथ, टालेवाडी, सिमरी पारगाव, महातपुरी, रिधोरी, भाटवडगाव, लुखेगाव, वांगी बु., शिंदेवाडी वांगी, टाकरवण, काळेगावथडी, डुब्बा मजरा, तेलगाव खु.,खानापुर, उमरी बु., चिंचगव्हण, फुले पिंपळगाव, सोमठाणा, छोटेवाडी या ग्रामपंचायतींवर अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. निवडणुका होईपर्यंत अधिकारी ग्रामपंचायतींचा कारभार पाहणार आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.