आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील संघ:परळी वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नागरगोजे

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परळी वकील संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ व्ही.बी.नागरगोजे यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली. यासह सचिवपदी ॲड.गजानन पारेकर यांची निवड करण्यात आली आहे.

सन २०२२-२३ या वर्षासाठी परळी वकील संघाची वार्षिक निवडणूक नुकतीच घेण्यात आली.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत ॲड.नागरगोजे यांना ८३ तर ॲड.राजेश्वर देशमुख यांना ६२ मते पडली.यावेळी सचिवपदी ॲड.गजानन पारेकर, उपाध्यक्षपदी ॲड.बुद्धभुषण उजगरे, कोषाध्यक्षपदी ॲड.व्ही.बी. घुले, सहसचिवपदी ॲड.ए.ए.शेख यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.एच.व्ही.गुट्टे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. राहुल सोळंके यांनी काम पहिले.

विजयी पदाधिकाऱ्यांचे ॲड.आर.व्ही.गित्ते, ॲड.प्रकाश मराठे, ॲड.मिर्झा मंजुर अली, ॲड.माधव मुंडे, ॲड.दिलीप स्वामी, ॲड.डी.एल.उजगरे, ॲड.नागापूरक, अॅड.डी.पी.कडबाने, ॲड.अविनाश पवार, ॲड.विलास बडे, ॲड.प्रदिप गिराम, ॲड.लक्ष्मण अघाव, ॲड.दत्तात्रय आंधळे, ॲड.दत्ता कराड, ॲड.सचिन सोळंके ॲड.बाळासाहेब मुंडे, ॲड.शशीकांत काजळे, ॲड.मनजित सुगरे, ॲड.कल्याण सटाले, ॲड. संजय रोडे, ॲड.मार्तंड शिंदे, ॲड.लक्षमण गित्ते, ॲड.ज्ञानोबा मुंडे, ॲड.राज इरफान, ॲड.अमोल सोळंके, ॲड.मोहन कराड, ॲड. सायस मुंडे, ॲड.सचिन सोळंके, ॲड. सोनेराव सातभाई, ॲड.गिरीश नरवणे, ॲड.प्रल्हाद फड आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...