आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पित्याने दोन मुलींच्या तोंडात उंदीर मारण्याच्या औषधाची ट्यूब पिळत स्वत:ही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना अंबड तालुक्यातील शहागड येथे गुरुवारी घडली. यात चिऊ ऊर्फ श्रेया कृष्णा पंडित (६) या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दाेन वर्षांची शिवाज्ञा ही दुसरी मुलगी गंभीर अाहे.
शहागडचे कृष्णा पंडित (३१) हे काॅम्प्युटरचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी मनीषा एका पतसंस्थेत कार्यरत आहे. कृष्णा पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. ८ मे राेजी कृष्णाने पत्नीच्या डोक्यात वीट मारली. मनीषाच्या डोक्यातून रक्त निघाल्याने खासगी रुग्णालयात नेले.
मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कृष्णाने त्याची मुलगी चिऊ ऊर्फ श्रेयासह दाेन वर्षांच्या शिवाज्ञाला शहागड येथील पैठण फाट्यावरील पाहुण्याच्या वीटभट्टीवर नेले. त्या ठिकाणी उंदीर मारण्याच्या औषधाची ट्यूब दोन्ही मुलींच्या तोंडात पिळली व तेच औषध स्वत:ही घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.