आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालव्हुरी (ता. केज) येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक धनंजय खामकर यांनी जीएसटी, कामगार विमा, रॉयल्टीची वसूल केलेली ८७ हजार ६४४ रुपये शासन खाती जमा केली नसल्याचे व व्यायामशाळेचे अपूर्ण काम पूर्ण झाल्याचे दाखवून तालुक्यात कार्यरत नसलेल्या कनिष्ठ अभियंता व उप अभियंत्यांची मोजमाप पुस्तिका व मुल्यांकन प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या बीडीओंच्या चौकशी अहवालावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी ग्रामसेवक खामकर यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली आहे.
लव्हुरी येथील पंडित वसंतराव चाळक व इतर नागरिकांनी ९ मे २०२२ रोजी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी चौकशी केली होती. या चौकशीत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक धनंजय आबाराव खामकर यांनी वरिष्ठांचे आदेशाचे पालन केल्या नसल्याचे, ग्रामपंचायतच्या व स्वतःच्या नावावर २ लाख ४० हजार रुपये उचलून लेखासंहिता २०११ मधील तरतुदीचे उल्लंघन करुन अनियमितता केल्याचे दिसुन आले आहे.
तसेच १२ टक्के जीएसटीचे ७३ हजार ३१८ रुपये, १ टक्के कामगार विम्याचे ६ हजार १९० रुपये व रॉयल्टीचे ८ हजार २१६ रुपये असे एकूण ८७ हजार ६४४ रुपये वसूल करून ही रक्कम शासन खाती भरणा केली नसल्याचे निदर्शनात आले. कामातील निधीपेक्षा रक्कम १ हजार ५०० रुपये जास्तीचा खर्च दर्शवून अनियमितता केली आहे. कार्यरत नसलेल्या अभियंत्यांच्या मोजमाप पुस्तिका तयार करुन व्यायामशाळेचे काम पूर्ण असल्याचे दाखवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.