आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ पाठपुराव्याला यश‎:आठ वर्षानंतर शहिद सुभेदार शिवाजी शिंदें चे स्मारक पूर्णत्वाकडे‎

बीड‎2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान मधील सुरजगड येथे‎ सैन्य दलात कार्यरत असलेले‎ लिंबागणेश येथील सुभेदार शिवाजी‎ रंगनाथ शिंदे हे आठ वर्षापूर्वी शहिद‎ झाल्यांनतर त्यांच्या पार्थीवावर‎ गावात शासकीय इतमामात‎ अंत्यसंस्कार करण्यात आले होते.‎ गावचे भुमिपुत्र असलेले शिवाजी‎ शिंदे यांची आठवण सदैव रहावी‎ म्हणून गावात स्मारक उभारले जावे‎ यासाठी ग्रामस्थांनी मागील आठ‎ वर्षापासून केलेल्या पाठपुराव्याला‎ अखेर यश आले असून गावातील‎ ग्रामपंचायतीसमोर त्यांचे स्मारक‎ तयार करण्यात आले असुन येत्या‎ काही महिन्यात लोकार्पण होणार‎ आहे.‎

बीड तालुक्यातील लिंबागणेश‎ येथील भुमिपुत्र असलेले सुभेदार‎ शिवाजी रंगनाथ शिंदे हे राजस्थान‎ येथील सुरजगड येथे भारतीय सैन्य‎ दलात कार्यरत असताना २ सप्टेंबर‎ २०१४ रोजी शहीद झाले होते.‎ त्यांच्या पार्थिवावर लिंबागणेश येथे‎ शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार‎ करण्यात आले होते. त्यांची‎ आठवण गावासह भावी‎ पिढीसाठीही सैदव रहावी म्हणून‎ गावात त्यांचे स्मारक उभारले जावे‎ अशी मागणी ग्रामस्थांनी‎ जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.‎

दरम्यान येथील शहीद सुभेदार‎ शिवाजी रंगनाथ शिंदे यांच्या पत्नी‎ साधना शिंदे, मुलगा कार्तिक शिंदे,‎ मुलगी शितल शिंदे यांचे तत्कालीन‎ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मंत्री‎ जयदत्त क्षीरसागर, आमदार‎ विनायक मेटे यांनी सांत्वन करत‎ गावात स्मारक बांधण्यासाठी‎ सहकार्य करू असे आश्वासन दिले‎ होते. यानंतर शहीद स्मारकासाठी‎ हुतात्मादिनी वीरपत्नी साधना शिंदे‎ यांनी सहकुटुंब ग्रामस्थांसह‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर‎ आंदोलन केले होते.

परंतु हा प्रश्न‎ मार्गीच लागला नव्हता. अखेर‎ स्मारकासाठी १७ सप्टेंबर २०१५‎ रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी‎ गावातील सामजिक कार्यकर्ते‎ डाॅ.गणेश ढवळे यांच्यासह वीरपत्नी‎ साधना शिंदे मुलगा कार्तिक‎ शिंदे,मुलगी शितल शिंदे यांच्यासह‎ ग्रामस्थ विक्की वाणी,मंगेश जाधव,‎ अभिजित गायकवाड, सय्यद‎ अझीम, अशोक वाणी, कल्याण‎ आबदार, सागर जाधव, दिपक‎ ढवळे, मयुर वाणी, अमोल जाधव,‎ प्रशांत वाणी, गणेश कानिटकर,‎ समाधान मुळे, चंद्रकांत शिंदे यांनी‎ बीडच्या जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर धरणे आंदोलन‎ केले होते. गावच्या सरपंच निकीता‎ गलधर, भाजप नेते स्वप्नील गलधर‎ यांच्या सहकार्याने गावातील‎ ग्रामपंचायत कार्यालयासमोरील‎ परिसरात स्मारक पूर्णत्वास येत‎ असून लवकरच त्याचे लोकार्पण‎ करण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...