आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस:छाननीअंती सरपंचपदाचे 19, सदस्यपदाचे 201 अर्ज अवैध

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सोमवारी निवडणूक विभागाकडून पार पडली. सरपंचपदासाठी ४ हजार ९७अर्ज वैध ठरले तर २ हजार २४७ प्रभागातून सदस्य पदासाठी १९ हजार ३७१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. सरंपच पदासाठीचे १९ तर सदस्य पदासाठी दाखल केलेल्या २०१ उमेदवारांचे अर्ज मात्र अवैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.

जिल्ह्यात सध्या ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबर रोजीपर्यंत सरपंच पदासाठी ४२१६ तर सदस्य पदासाठी १९८६१ इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले. सोमवारी निवडणूक विभागाकडून अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली. आज ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. त्यानंतर लगेच निवडणूक चिन्ह वाटप होईल. अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी निवडणूक विभागाकडून प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...