आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज बाद:चंदनसावरगाव येथे पॅनल प्रमुखाचा अर्ज झाला बाद

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका पॅनल प्रमुखाचा अर्ज ठेकेदारीवरून बाद झाला. सरपंच आणि उपसरपंच पद भोगता आले. मात्र या निवडणुकीत अर्ज बाद झाल्याने सदस्य होण्याचे स्वप्न भंगले. चंदनसावरगाव येथील मधुकर रामकृष्ण तपसे हे पाच वर्ष गावचे सरपंच राहिले होते. गत निवडणुकीत त्यांनी उभ्या केलेल्या पॅनलने बाजी मारली होती. त्यांच्या गटाच्या महिला जनतेतून सरपंच पदावर निवडून आल्या होत्या. तर मदन तपसे हे उपसरपंच झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सत्तेची सूत्रे त्यांच्याकडे राहिली होती. या निवडणुकीसाठी सरपंच पद महिलेसाठी राखीव राहिले. मात्र त्यांनी ग्रामविकास पॅनल तयार करून पुन्हा उपसरपंच होण्यासाठी सदस्य पदाची उमेदवारी दाखल केली होती. पॅनल प्रमुख असल्याने त्यांच्या उमेदवारीवर कोणी आक्षेप घेईल. असे त्यांना ही वाटले नव्हते.

त्यांच्या विरोधी जनविकास परिवर्तन पॅनलमधील प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल छत्रभुज तपसे यांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत ते गुत्तेदार असल्याचे त्यांनी ग्रामपंचायतीचे कामे केल्याचे पुरावे सादर केले होते. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मदन तपसे या पॅनल प्रमुखांचा ठेकेदारीवरून अर्ज बाद केला. त्यानंतर न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला.

बातम्या आणखी आहेत...