आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अतिउत्साह भोवला:कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी बँड वाजवून फटाके फोडून व्यक्त केला आनंद, पोलिसांत गुन्हा दाखल

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याबद्दल व्यक्त केलेला आनंद भोवला
Advertisement
Advertisement

माजलगाव येथील डॉक्टरांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर व्यक्त केलेला आनंद भोवला आहे. कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉ. देशपांडे यांनी हॉस्पिटलसमोर फटाके फोडून बॅन्ड वाजवून आनंद व्यक्त केल्याप्रकरणी त्यांच्यासह इतर स्टाफ, बॅन्ड पथकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

माजलगाव शहरातील डॉ.देशपांडे हॉस्पिटलमध्ये धारुर तालुक्यातील आंबे वडगाव येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने तीन दिवस उपचार घेतले होते. या रुग्णाच्या संपर्कातील 58 जणांचे स्वॅब गुरुवारी निगेटीव्ह आले. त्यात डॉ. देशपांडे, त्यांच्या हॉस्पिटलमधील स्टाफ यांचा समावेश होता. परंतु रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांनी हॉस्पिटलसमोर फटाके फोडले आणि बॅन्ड वाजवून जल्लोष केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बीड जिल्ह्यात व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली असून डॉक्टर गजानन देशपांडे, त्यांचा मुलगा डॉ.श्रेयस देशपांडे, स्टाफमधील चेतन मिसाळ, अजय जाधव, प्रशांत भिसे, राहूल टाकणखार, अशोक घोडके, चेतन फुंदे, बालाजी क्षीरसागर यांच्यासह बॅन्जो पथकातील आठ ते नऊ जणांविरोधात माजलगाव शहर ठाण्यात पो.ना.राऊत यांच्या फिर्यादीवरुन मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 व फटाके फोडल्याप्रकरणी 135 भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

Advertisement
0