आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:मागणीनंतर बुजवले प्रशासनाने खड्डे ; सिद्धिविनायक संकुल परिसरात केले काम

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरातील गणेश मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी शिष्टमंडळासह नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर सिद्धिविनायक संकुल परिसरातील खड्डे बुजवण्यात आले आहेत.गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सिद्धिविनायक संकुल परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते. गणेश मूर्तीचे स्टॉल असतात, गौरींचे मुखवटे विक्रीसाठी असतात सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची या परिसरात गर्दी असते. मात्र येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे बीड नगर परिषदेचे माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी शिष्टमंडळासह बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांची भेट घेतली होती.

तत्काळ खड्डे बुजवण्यासाठी त्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर मंगळवारीच हे खड्डे बुजवले गेले. येणाऱ्या काही दिवसांत हा रस्ता सिमेंटचा होणार आहे. भाजी मंडई कॉर्नर ते सिद्धिविनायक संकुल, शहर पोलिस स्टेशन ते सारडा संकुलदरम्यान खड्डे बुजवण्याचे काम झालेे.या प्रसंगी नगरसेवक शुभम धूत, शैलेश नाईकवाडे, अमर विद्यागर, ऋषभ वाघमारे, अभिजित आव्हाड, शाकेर इनामदार उपस्थित होते.दरम्यान, शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी केल्याबद्दल नागरिकांनी डॉ. क्षीरसागर यांचे आभार व्यक्त केले तर, त्यांच्या मागणीचीही तत्काळ दखल घेत पालिका प्रशासनाने हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याने समाधान व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...