आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य:शाळेच्या दुरुस्तीनंतर खोल्यांचे जुने पत्रे, इतर साहित्य केले गायब

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेलगाव गांजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतर गुत्तेदाराने जुन्या पत्र्यासह इतर साहित्य लंपास केल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीने केली होती. त्यावरून केंद्रप्रमुखांनी चौकशी करून अहवाल सादर केला असून त्याचा अभिप्राय बीईओंनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला. आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.

दुरुस्तीचे काम करणारा गुत्तेदार शाळेतील जुने पत्रे व इतर जुने साहित्य घेऊन गेल्याची तक्रार करीत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शाळा समितीचे अध्यक्ष उद्धव जाधव, सुनील जाधव, अशोक जाधव, विठ्ठल पटणे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखास चौकशी करण्याचे आदेश दिले होते. केंद्रप्रमुखांनी ११ ऑगस्ट रोजी शाळेला भेट देत चौकशी करून १७ ऑगस्ट रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला. त्या अहवालात पत्रे, खिडक्या, दरवाजे व फरशी दुरुस्त केली असून शाळेत ४ जुने पत्रे आहेत.

तसेच जुने अँगल वापरात आणलेले आहे अशी माहिती मुख्याध्यापकांनी केंद्रप्रमुखाला दिली. परंतु जुने साहित्य हे दुरुस्तीचे काम करणाऱ्या गुत्तेदाराने शाळेत ठेवले नाही. असे पत्र दिले आहे. या अहवालावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ३० ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अभिप्रायामध्ये शाळा दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पत्रे शाळेत ठेवले नसल्याचा उल्लेख केला आहे. आता गटविकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...