आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडसाद:ठरावानंतर तारांच्या दुरुस्तीची तीन वर्षांपूर्वीच निघाली होती ऑर्डर; दुरुस्ती नसल्याने दुर्घटना

विशेष प्रतिनिधी | गेवराई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोपटी तांड्यावरील लोंबणाऱ्या तारांच्या दुरूस्तीसाठी तीन वर्षापूर्वी जातेगाव- खोपटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीने ठराव घेत दुरूस्तीची मागणी केली. २०१९ मध्ये दुरूस्तीसाठी ऑर्डर निघुन काम करणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणीही केली. दुरूस्ती झाली असती तर रविवारची घटना घडलीच नसती असा आरोप खोपटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामेश्वर पवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे वीज तारा दुरुस्तीसाठी ठराव, अर्ज अथवा मागणीच आली नाही, मागणी असती तर आम्ही प्राधान्याने दुरुस्ती केली असती असे महावितरणचे सिरसदेवी पथक प्रमुख अविनाश बयताडे यांनी म्हटले आहे. दरम्यान गेवराई तालुक्यातील खोपटी तांडा येथे लोंबकळणाऱ्या ताराचा पीकआपला स्पर्श झाल्याने रविवारी दुपारी एक शेतकऱ्याला जीव गमावाला लागला असून दुसरा शेतकरी गंभीर भाजला. अन्य तीन शेतमजूर जखमी झाले आहे.

बीड तालुक्यातील आडगाव येथील चार मजूर पिकअप घेऊन गेवराई तालुक्यातील जातेगाव जवळील खोपटी तांडा येथून कोलतेवाडी शिवारात ऊसाचे वाढे आणण्यासाठी निघाले होते. वाटेत खोपटी तांड्यावर त्यांनी शेतकरी आलू हरसिंग पवार (६५) यांच्याकडे कोलतेवाडी शिवारात ऊसतोड कोठे सुरू आहे. याची विचारणा केली. तेंव्हा आलु पवार यांनी मी देखील तिकडेच जात असल्याचे सांगुन ते पिकअपमध्ये बसले होते.

...तर घटना टळली असती
मागील चार वर्षांत आम्ही शेतात लोंबकळणाऱ्या ताराची महावितरणने दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. पंरतु महावितरणने याकडे लक्ष दिले असते तर रविवारीची घटना घडली नसती.-रामेश्वर पवार, उपसरंपच, जातेगाव-खोपटी

आम्ही दुरुस्ती करतोच
विजेच्या तारा दुरुस्त करण्यासाठी ठराव, अर्ज, निवेदन किंवा मागणी नाही. तार कुठे लोंबकळत असलेल्या ताराच्या बाबतीत मागणी आली तर दुरुस्ती करून घेतोत.
-अविनाश बयताडे,पथकप्रमुख, सिरसदेवी

बातम्या आणखी आहेत...