आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे दुसऱ्या दिवशी उपोषण मागे ; अतिक्रमण हटवण्यासाठी बसले होते उपोषणाला

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज शहरातील सटवाई मंदिर, भोसले व कोल्हे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उपोषण मागे घेतले. तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सकाळी ११ वाजता उपोषणस्थळी जाऊन नगरसेवक भाऊसाहेब गुंड, सोमनाथ गुंड, पप्पू इनामदार यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. त्यानंतर ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व हनुमंत भोसले यांच्या मध्यस्थीने याप्रकरणी सुनावणी घेऊन १५ दिवसांत निर्णय घेऊ असे लेखी आश्वासनाचे पत्र नायब तहसीलदार आशा वाघ यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे. यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले आहे. या वेळी मोहन गुंड, शकील शेख, राजाभाऊ औटी, चंद्रकांत गुंड, किसन गाढवे, पांडुरंग महाडिक, दत्ता शेटे, सुभाष कोल्हे, लिंबाजी सोनवणे, बंडू औटी, नारायण वळसे, सुधाकर पांचाळ, विष्णू वळसे, बाळासाहेब सत्वधर, अमोल औटी, शेख सोहील, शंकुतला औटी, कोंडाबाई साळुंके, मीना औटी, रिजवाना शेख, सुरेखा महाडिक, सुवर्णमाला सोनवणे आदी उपोषणकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...