आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा विवाह:पहिल्या पत्नीचा छळ करत दुसरीशी केला विवाह

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येत नसल्याच्या कारणावरून पतीसह इतर नातेवाईकांनी पहिल्या पत्नीचा छळ करीत तिला माहेरी सोडून देत दुसरा विवाह केल्याची घटना घडली. याप्रकरणी पतीसह १० जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. केज तालुक्यातील होळ हे माहेर असलेल्या क्रांती बाळासाहेब तरकसे (२४) हिचा विवाह २२ एप्रिल २०१६ रोजी सोनवळा (ता. अंबाजोगाई) येथील बाळासाहेब तरकसे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर चारित्र्यावर संशय घेऊन व गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येत नसल्याच्या कारणावरून पती बाळासाहेब तरकसे, सासरे गोरखनाथ तरकसे, सासु अलका तरकसे, नणंद राणी जाधव, नणंदावा विलास जाधव, नणंद विद्या कांबळे, नणंदावा राजेभाऊ कांबळे, चुलत सासरे सुभाष तरकसे, चुलत दीर संतोष तरकसे, जाऊ प्रियंका तरकसे यांनी संगनमताने क्रांती हिचा सतत शिवीगाळ व मारहाण करुन शारीरीक, मानसिक व आर्थिक छळ केला. त्यानंतर क्रांती हिला माहेरी आणून सोडले होते.

बातम्या आणखी आहेत...