आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा पावला:कोरोनाच्या दोन वर्षांनी डीजेचा दणदणाट ; गणेशोत्सवात कोट्यवधी रुपयांची उलाढाल

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात ज्या डीजे, ब्रास बॅन्ड चालकांना हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली होती. त्या डीजे चालकांना यंदा गणेशोत्सवात बाप्पा पावला. जिल्ह्यातील गणेशोत्सवात डिजेच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल झाली. पोलिसांनी ६५ डेसिबलच्या आत डिजेच्या आवाजाची चालकांना घातलेली मर्यादा व वादग्रस्त गाणे न वाजवण्याच्या दिलेल्या सूचना पाळल्याने गणेशोत्सव शांततेत पार पडला. जिल्ह्यात ३५० च्या आसपास डिजेचालक असून बीड शहरात डीजे चालकांची संख्या २५ च्या घरात आहे. कोरोना काळात जिल्ह्यात मिरवणुकांसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी होती. परंतु, यंदा कोरोनाचे निर्बंध हटल्याने गणेशभक्तांनी एकत्र येत गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याचा संकल्प केला होता. यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवण्याच्या ऑर्डर मिळाल्याने डीजे चालकांत आनंदाचे वातावरण होते. सहा जणांचे मनुष्यबळ मोठ्या डिजेवर असते. त्यामुळे मोठ्या डिजेवर तरुणांना रोजगार मिळाला. लहान डीजे चालकांना १० ते २० हजार रुपयांची ऑर्डर तर मोठ्या डीजे चालकांना ४० ते ५० हजार रुपयांची ऑर्डर मिळाली होती. त्याच बरोबर बीड शहरातील काही गणेश मंडळांनी डिजेऐवजी ढोल पथक, हालगी, टाळ मृदंग अशा पारंपरिक वाद्याला पसंती दिली.

वाद होणारे गाणे न वाजवण्यासाठी दिली समज जिल्ह्यात यंदा डीजे चालकांची पोलिसांनी बैठक घेऊन गणेशोत्सवात वाद होतील, अशी गाणे वाजवण्यात येऊ नयेत असे आवाहन केले होते. डीजे चालक व गणेश मंडळांना नियमाचे पालन करावे अशा नोटिसाही बजावल्या होत्या. डिजेचा आवाज ६५ डेसिबलच्या पुढे जावू नये असा दंडक डीजे चालकांना होता. या नियमांचे डीजे चालक व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालन केल्याने गणेशोत्सवात वाद झाले नाहीत. परजिल्ह्यातील डिजेचा शिरकाव : यंदा पुणे, सातारा, नाशिक, सांगली येथील मोठ्या डीजे चालकांना बीडमधील गणेशोत्सवाच्या ऑर्डर मिळाल्या होत्या. त्यामुळे असे पर जिल्ह्यातील डीजे बीड शहरात डेरेदाखल झाले होते.

गणेशोत्सव शांततेत झाला याचे समाधान
जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून बीड शहरात लाखो रुपये तर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. हा आकडा निश्चित सांगता येणार नाही. परंतु, यंदा गणेशोत्सव शांतता पूर्ण वातावरणात पार पडला. याचे आम्हाला समाधान आहे. नवरात्रीत आर्थिक उलाढाल होऊ शकते.
गणेश कुडूक, चालक , सिद्धार्थ साउंंड अँड लाइट, बीड

बातम्या आणखी आहेत...