आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक राज्यातील बदामीतील शाकंभरी देवीचे मंदिर बीड शहरातही असावे या भावनेतून ३१ वर्षापूर्वी कोष्टी समाज बांधवांनी एकत्रीत येवुन सुरूवातीला जागा खरेदी केली. त्यानंतर ६ वर्षानंतर लाेकसहभाागातून देवीचे मंदिर उभारून देवीची प्रतिष्ठापणा केली हाेती. आता हे मंदिर बीडकरांचे श्रध्दास्थान बनले आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर आज देवीची शोभायात्रा काढली जात आहे. कर्नाटकच्या बदामी येथे शाकंभरी देवी असून या देवीला बनशंकरी असेही म्हटले जाते. हीच देवी महाराष्ट्रात चौंडेश्वरी नावाने ओळखली जाते. या देवीचे मंदिर बीड शहरात असले पाहिजे या उद्दात भावनेतून १९८५ मध्ये समाज बांधवांनी एकत्र येत क्रांतीनगर येथे देवीचे मंदिर उभारण्यासाठी ५० बाय ६० आकाराचा भुखंड लोकसहभागातून खरेदी केला.
त्यांनतर आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील कारागिरांकडून देवीची काळ्या पाषाणाची मूर्ती आणली. २० मे १९९१ रोजी कर्नाटक राज्यातील हंपी येथील गायत्रीपिठाचे प्रमुख दयानंदपुरी महास्वामी, संत सुदामदेव महाराज यांच्या हस्ते शाकंभरी देवीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. याच बरोबर गणपती, मारोती, दत्तात्रय, महादेव अशा मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीसाठी टी.टी तावरे, वसंतराव वाघुंबरे, राम उपरे, श्रीकृष्ण भंडारे, विठ्ठलराव फासे, बंडू गुगले, सुभाष पांडकर, ज्ञानोबा असलकर यांनी हे मंदिर उभारण्यासाठी परिश्रम घेतले होते.
बीड शहरातील हिरालाल चौकातुन शुक्रवारी चौंडेश्वरी देवीच्या शोभायात्रेस रथातुन सुरूवात होणार आहे. फुलांनी सजवलेल्या रथात देवीची प्रतिमा राहणार आहे. ही शोभायात्रा माळीवेस- सुभाषरोड- अण्णाभाऊ साठे चौक, आदर्शनगर मार्गे क्रांतीनगर येथे पोहचणार आहे. या ठिकाणी देवीची महाआरती केली जाणार आहे. -राजेंद्र सपाटे, उत्सव समिती, अध्यक्ष
दोन हजार भाविकांसाठी महाप्रसाद चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात आज शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्त दोन हजार भाविकांच्या महाप्रसादाचे आयोजन मंदिर ट्रस्ट व कोष्टी समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले आहे. -सुरेश असलेकर, अध्यक्ष, कोष्टी समाजसेवी मंडळ, बीड
कर्नाटकच्या शाकंभरी देवीचे बीडमध्ये ठाणे, लोकसहभागातून ३१ वर्षापूर्वी उभारले हाेते देवीचे मंदिर ३१ वर्षात मंदिराचा कायापालट क्रांतीनगरातील चौंडेश्वरी देवीच्या मंदिराचा मागील ३१ वर्षात भाविकांचा लोकसहभाग व लोकप्रतिनिधींचा विकास निधी यातुन कायापालट झाला आहे. सध्या सभामंडप, हॉल, पिण्याचे पाणी, त्याच बरोबर सध्या सभामंडपात फरशीचे काम आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विकास निधीतुन होत असल्याची माहिती उपाध्यक्ष रविंद्र म्हेत्रे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.