आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध; जिल्हा युवक काँग्रेसतर्फे गेवराईत अग्निपथ विरुद्ध मशाल मोर्चा

गेवराई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात खासदार रजनीताई पाटील व कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात गेवराई विधानसभा युवक काँग्रेसने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आणि ‘अग्निपथ भरती योजनेविरुद्ध मशाल मोर्चा काढून राहुल गांधी यांची सुरू केलेली ईडी चौकशी याविरोधात निदर्शने केली. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि युवकांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली.

या वेळी किरण अजबकर (तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष) यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात भाषण केले. जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. बेदरे, तालुकाध्यक्ष किरण आजबकर, योगेश बोबडे, ॲड. नीलेश माळवे, मनोज कदम, बाळासाहेब अतकरे, बळीराम गिराम, शेख अल्ताफ, राजू पोपळघट, शेख खुद्दूस, मुन्ना सावंत आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...