आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे नोंदवा:अघोरी कृत्य : पती, सासू व भोंदूबाबावर गुन्हे नोंदवा

शिरुरकासार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निमगाव मायंबा येथील एका महिलेच्या अंगातील भूत काढण्यासाठी राक्षसभवन (शनी) येथून एका भोंदू बाबाला बोलवून अघोरी कृत्य करणारे सासू व पती यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश शिरूर न्यायालयाने दिला आहे.

निमगाव मायंबा येथील दीक्षा कल्याण कातखडे हिला भूतबाधा झाली असून तिच्या अंगातील भूत काढण्यासाठी पती कल्याण माणिक कातकडे सासू लक्ष्मी माणिक कातकडे यांनी राक्षसभवन येथून भोंदू महाराज मारुती जनार्धन वावरे यांना बोलावून घेतले. तंत्र, मंत्र व अघोरी करत भोंदू बाबाने दीक्षा हिला गुंगीचे औषध व लिंबू पाणी देऊन बेशुद्ध केले व तिच्या अंगातील भूत काढण्यासाठी कवड्याच्या माळीने तिच्या डोक्यावर प्रहार केला. भूत काढण्याच्या नावाखाली तिला अमानुष मारहाण देखील करण्यात आली यामुळे दीक्षा काही काळ बेशुद्ध पडून राहिली.

हा प्रकार निमगाव मायंबा येथे तिच्या राहत्या घरी १६ फेब्रुवारी २०२२ मध्ये दुपारी एकच्या दरम्यान घडला. डोक्याला मुका मार लागला असल्याने तिचे डोके सातत्याने दुखत आहे यामुळे तिने या प्रकाराबाबत वडिलांना सांगितले दीक्षा व वडील दोघे चकलंबा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता तेथील पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद करून घेतला नाही यामुळे दीक्षा हिने शिरूर न्यायालयात दाद मागितली. यावर शिरूर न्यायालयाने भोंदू महाराज पती व सासू यांच्यावर गुन्हे दाखल करून घेण्यात यावे असे आदेश चकलंबा पोलिस ठाण्याला दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...