आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अंबाजोगाईत जीवन विमा प्रतिनिधींचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

अंबाजोगाई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भारतीय जीवन विमा महामंडळाच्या कार्यालयासमोर विमा प्रतिनिधींच्या ऑल इंडिया लिआयफी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी (५ सप्टेंबर) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

देशव्यापी विमा प्रतिनिधींच्या ऑल इंडिया लिआयफी संघटनेच्या वतीने विमा पॉलिसीवरील कर्जाचे व्याजदर व थकीत हप्त्यावरील आकारण्यात येणाऱ्या दंडाचे दर कमी करावे, विमा हप्त्यावरील लावण्यात आलेली जीएसटी मागे घ्यावी, पॉलिसीधारकास बोनस वाढवावे, विमा प्रतिनिधींना ग्रच्युइटीमध्ये वाढ करावी, विमा प्रतिनिधीला पेन्शन मिळाली पाहिजे अशा अनेक मागण्यासाठी लिआयफी संघटनेचे विभागीय संघटक सचिव वसंत कराड, शाखाध्यक्ष दत्ता आपेट, उपाध्यक्ष प्रकाश देशपांडे, कोषाध्यक्ष श्रीराम इंगळे, सचिव हर्षद भताने, मुख्य विमा सल्लागार अध्यक्ष बाळासाहेब साखरे, संजय रानभरे, संतोष शिंदे, नृसिंह केंद्रे, बाळासाहेब केंद्रे, गोविंद वेडे, जितेंद्र मोरे, आजमर पाशा, ज्ञानोबा फड, तानाजी शिंपले, ज्योतिराम ओताडे आदी विमा प्रतिनिधींनी धरणे आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...