आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:माजलगावात 9 डिसें.पासून कृषी प्रदर्शन; सौर उर्जेसह पणन-विपणनवर मार्गदर्शन

माजलगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव शहरातील बायपास रोडवरील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या ९ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२२ दरम्यान पहिले राज्यस्तरीय सुंदर कृषी प्रदर्शन होणार आहे. या कृषी प्रदर्शनात देशातील २५० नामांकीत कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती विरेंद्र सोळंके व संयोजन समितीचे सदस्य अॅड. बी. आर. डक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. राज्यस्तरीय सुंदर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या ९ डिसेंबर २०२२ रोजी आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते होणार असून १० डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शेतकरी मेळाव्यास राजेंद्र पवार हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन होणार असून ११ डिसेंबरला रोजी सकाळी अकरा वाजता महिला बचत गट व महिला गृह लघुउद्योग मेळाव्यात रूपालीताई चाकणकर या मार्गदर्शन करणार आहेत.

त्यानंतर दुपारी तीन वाजता महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून १२ डिसेंबर रोजी सरपंच, ग्रामसेवा सोसासयटी, चेअरमन मेळावा सकाळी अकरा वाजता होणार असुन माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन होणार अाहे. दुपारी तीन वाजता विविध फळ बागायतदाराचा मेळावा होणार असून या मेळाव्यात कसपटे, मारोतीराव जाधव, पतंगराव कदम हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत विरेंद्र सोळंके व संयोजन समितीचे सदस्य अॅड. बी.आर. डक यांनी दिली आहे. यावेळी अच्युत लाटे, राहुल लंगडे, भगवान शेजुळ, शंतनु सोळंके, उपप्राचार्य मुळे, प्रशांत चव्हाण, विलास कुरे यांच्यासह रविंद्र कानडे आदी उपस्थित होते.

२५० नामांकित कंपन्या होणार सहभागी
माजलगाव येथील पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात शेती अवजारे, बी-बियाणे, लागवड साहित्य, शेती औषधी, ग्रीन हाउस व साहित्य, जैवतंत्रज्ञान, हॉर्टीकल्चर, सेरीकल्चर, सिंचन यंत्रणा, पशूधन विकास, सौर उर्जा, जलव्यवस्थापन, डेअरी तंत्रज्ञान व उत्पादने, कुक्कुट पालन, शेतमाल साठवणूक यंत्रणा, अपारंपारिक उर्जा, पणन व विपणन, आंतरराष्ट्ीय बाजारपेठ, शेतविमा व अर्थसहाय्य, शैक्षणिक संस्था, सहकार क्षेत्र, फार्म टेक्नॉलॉजी, उती तंत्रज्ञान, जैविक खते, फार्म मशिनरी अशा विविध संस्था, अस्थापना, कंपन्या सहभागी होणार आहेत.

१३ डिसेंबर रोजी कृषी प्रदर्शनाचा समारोप
१३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता राज्यस्तरीय सुंदर कृषी प्रदर्शनाचा समारोप होणार १३ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कृषी प्रक्रिया उद्योग मेळावा होणार अाहे. दुपारी एक वाजता मल्टीस्टेट फेडरेशन कर्मचारी, अधिकारी तसेच कृषी उद्योग अर्थसहाय्य मार्गदर्शन मेळावा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...