आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:पिंपळगावात शेतीचा वाद; दांपत्यास काठीने मारहाण

केज8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेत मोजू का देत अशी भांडणाची कुरापत काढून एका दांपत्यास काठीने मारून दुखापत केल्याची घटना पिंपळगाव (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपळगाव (ता. केज) येथील शेतकरी अरुण कडुबा तांदळे (५०) हे १९ जून रोजी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या विडा शिवारातील शेतात असताना विद्या विजय फड (रा. बीड), सुरेश शिवाजी तांदळे (रा. तांदळ्याची), कृष्णा महारुद्र ढाकणे, पांडुरंग महारुद्र ढाकणे (रा. पिंपळगाव) यांनी संगनमत करून शेत मोजू का देत अशी भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर कृष्णा ढाकणे व पांडुरंग ढाकणे यांनी काठीने अरुण तांदळे यांना मारहाण करून जखमी केले. तर त्यांच्या पत्नीस कृष्णा ढाकणे याने डोक्यात मारून मुक्कामार दिला. अशी फिर्याद अरुण ढाकणे यांनी दिल्यावरून विद्या फड, सुरेश तांदळे, कृष्णा ढाकणे, पांडुरंग ढाकणे या चार जणांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...