आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:तीन गावांचा शेतीचा वीजपुरवठा तीन महिन्यांपासून बंद; आंदोलनाचा इशारा

केज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज, तांबवा, सोनीजवळा या गावातील शेतीचा विद्युत पुरवठा मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याची दखल घेऊन तत्काळ विद्युत विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा रास्ता रोको करू, असा इशारा शेकापचे मोहन गुंड यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला.

येत्या आठ दिवसांत १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसवून पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा चालू करावा, अन्यथा विद्युत महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांसह शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केज शहरातील धारूर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेकापचे भाई मोहन गुंड, भाई अशोक रोडे, शेतकरी अशोक कदम, निजामोद्दीन हरणमारे, शंकर पाखरे, मधुकर पटेकर, जयवंत देशपांडे, सुरेंद्र राऊत, राजेभाऊ सत्त्वधर, कांता ससाण आदींनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला .

बातम्या आणखी आहेत...