आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:हवामान बदलानुसार शेती केली जावी : प्रा. सुरवसे यांचे युवकांना मार्गदर्शन

बीड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण बदलत्या हवामानानुसार आपल्या पारंपरिक शेती पद्धतीला आधुनिकतेची जोड देऊन चांगले उत्पन्न मिळवू शकतो. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घेऊन त्यानुसार आपल्या पीक पद्धतीत बदल करावा, असे प्रतिपादन बलभीम महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्रा. एस. एस.सुरवसे यांनी केले.

बलभीम महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व ॲग्रो केमिस्ट्री विभाग यांच्या वतीने पेंडगाव येथील सबदर अली देशमुख राष्ट्रीय विद्यालय, पेंडगाव, ता.जि. बीड च्या विद्यार्थ्यांना ८ मार्च रोजी ‘शेती विषयक मार्गदर्शन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप आणि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डॉ.गणेश मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली ॲग्रो केमिस्ट्री विभागातील प्रा. एस. एस. सुरवसे, प्रा. वाय. एम. काळकुटे, प्रा.ए.एस. जगताप यांनी पेडगाव येथील या शाळेतील विद्यार्थ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन शेती विषयक आणि शेती संबंधित शिक्षण व शेती व्यवसायातील भविष्यातील संधी याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत पेरणीपूर्व तयारी म्हणजे काय? पीक नियोजन कसे करायचे, कीड नियंत्रण याविषयी प्रा. एस.ए. सुरवसे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

याबाबत दिली माहिती माती परीक्षण का गरजेचे आहे व ते कसे करतात, माती परीक्षण किटचा वापर करून माती परीक्षण कसे केले जाते व बीड जिल्ह्यात अशा माती परीक्षण प्रयोगशाळा कुठे आहेत याबद्दल माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...