आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:अहिल्यादेवी धार्मिक होत्या, धर्मांध नव्हत्या : सोनसळे

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजमाता अहिल्याबाई होळकर धार्मिक होत्या परंतु धर्मांध नव्हत्या. त्यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण समाजाला देऊन मानवता हा एकच धर्म आहे असा संदेश दिला, असे प्रतिपादन व्याख्याते बाळासाहेब सोनसळे यांनी केले.अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान मित्र मंडळ पिंपळी धामणगाव यांच्यावतीने आयोजित राजमाता अहिल्याबाई होळकर सार्वजनिक जन्मोत्सव प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब चौधरी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात, रमेश आढाव, बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबू गोसावी, रासपचे नेते शिवाजी तरवटे, मौर्य क्रांती संघाचे हनुमान दवंडे, व्याख्याते गोविंद गोचडे,नंदकुमार गांजे, रंजीत कोल्हे, दत्ता कोल्हे इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

महापुरुषांचे प्रतिमापूजन, भव्य मिरवणूक व महापुरुषांच्या विचारांचा जागर करत गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक,सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,सेवा सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, तरुण युवक, युवती यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी रामप्रसाद थोरात, रमेश आढाव, गोविंद गोचडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद मोगरे यांनी केले तर सुत्रसंचलन काळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे अध्यक्ष विष्णू कुरधने, उपाध्यक्ष लखन काळे, सचिव विठ्ठल काळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...