आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी चे काम ४-५ वर्षांपासून रखडलेले असून, निकृष्ट कामामुळे रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. अपघातामुळे मृत्यूमुखी पडणारांची संख्या वाढली असून, याविषयी वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा केवळ थातूरमातूर डागडुजी करण्याचे काम पीएचपी कंपनीकडून होत आहे. याबाबत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत गुत्तेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी याचे काम रखडलेलेच आहे. कालावधी पुर्ण होऊनही काम अद्याप अपुर्णच आहे. एकूण १७० किलोमीटर लांबी असलेल्या महामार्गाची अंदाजे किंमत ८७९ कोटी रुपये इतकी आहे.
पाटोदा तालुक्यातील चुंबळी ते बीड तालुक्यातील मांजरसुंभा हे १६६ कोटी रुपयांचे काम हुले कन्स्ट्रक्शन तसेच मांजरसुंभा ते पिंपळा ३९५ कोटी रुपयांचे काम एचपीएम कंपनी व पिंपळा ते अहमदपूर ३१८ कोटी रूपयांचे काम सत्यसाईबाबा कंपनी यांच्या मार्फत करण्यात येत आहे. बीड तालुक्यातील नेकनुर ते मांजरसुंभा दरम्यान गवारी फाट्यावर निकृष्ट कामामुळेच भेगा पडलेल्या तसेच खड्डे पडलेले आहेत.
बऱ्याच दिवसापासून रखडलेले, जागोजागी अर्धवट काम असुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे जागोजागी भेगा पडलेले, खड्डे पडलेले आहेत. हे राष्ट्रीय महामार्ग मृत्युचे सापळे बनलेले आहेतत. ्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात अनेक लाेक मृत्युमुखी पडत आहेत.हे काम तत्काळ पुर्ण करण्यात यावे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.
कारवाई करण्याची गरज अहमदपूर ते अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. वारंवार आंदोलने करून, निवेदन देऊनही यंत्रणा सुस्त आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. या प्रकरणात गुत्तेदार कंपनीला दंड ठोठावून काळ्या यादीत टाकावे - डॉ गणेश ढवळेअहमदपूर - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.