आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याकरिता रचनात्मक पद्धतीने काम करण्याचे ध्येय; कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे प्रदेश उपाध्यक्ष सोहनींचे प्रतिपादन

माजलगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यापारी हा समाज व्यवस्थेचा कणा असला तरी तो अनेक अडचणींचा कायम सामना करीत असतो, व्यापाऱ्यांच्या प्रत्येक बारीकसारीक अडचणी सोडविण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असू, असे प्रतिपादन कॉन्फ्रेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष सोहनी यांनी केले. जिल्हा व्यापारी महासंघ बीडचे अध्यक्ष संतोष सोहनी यांची सर्वानुमते नुकतीच कॉन्फ्रेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यानिमित्त माजलगावच्या शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ व्यापारी अनंत रुद्रवार हजर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद पिंगळे, तालुकाध्यक्ष संजय सोळंके, व्यापारी धनराज बंब, संतोष आब्बड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅटचे कार्याध्यक्ष रियाज काझी यांनी केल्यानंतर विनोद पिंगळे यांनी व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेत त्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावरून कशा पध्दतीने काम सुरू आहे याची माहिती दिली. यावेळी विनोद पिंगळे यांना देखील सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ व्यापारी अनंत रुद्रवार यांनीही व्यापारी बांधवांना मार्गदर्शन केले.

या समारंभ प्रसंगाचे औचित्य साधून माजलगाव येथील सर्व पोट संघटनांच्या वतीने देखील सोहनी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजलगाव शहरातील जवळपास अडीचशे ते तीनशे व्यापारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज काझी यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मितेश चिद्रवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅट तथा किराणा व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय सोळंके पदाधिकारी कपिल पगारिया, रामराजे रांजवण, तुषार भुतडा, राहुल खुरपे, अशोक बिक्कड, कैलास मानधने, राजू दाभाडे, लक्ष्मीकांत झिंजुर्के, अश्विन राठोर, अजय डाके, राजाभाऊ जमदाडे, ऋषी निंबाळकर, संजय होके, बजरंग कुमावत, भागवत आरडे आदींनी परिश्रम घेतले.

प्रशासन दरबारी प्रश्न मांडून त्याचे निराकरण करून घेणार
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ही व्यापाऱ्यांची आणि खास करून किराणा व्यापाऱ्यांची प्रभावी संघटना आहे. प्रथमच या संघटनेत बीड जिल्ह्यातील व्यक्तीला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, ते प्रशासन दरबारी पोहोचत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात या समस्या, प्रश्न जाणून घेत ते अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे संतोष सोहनी यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच माजलगाव तालुका कार्यकारिणीचे आभार त्यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...