आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप‎:अखंड हरिनाम सप्ताहास‎ करचुंडी येथे प्रारंभ‎‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ तालुक्यातील करचुंडी येथे श्री‎ क्षेत्र नारायणगडचे चौथे महंत‎ वैकुंठवासी गोविंद बाबा यांच्या‎ १५५ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड‎ हरिनाम सप्ताहाचे आयोजन‎ करण्यात आले आहे.‎ यानिमित्त रोज पहाटे ४ ते ६‎ काकडा भजन, ६ ते ७‎ विष्णूसहस्त्रनाम, १० ते १२‎ जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा‎ भजन, दुपारी २ ते ५ भावार्थ‎ रामायण, सायंकाळी ५ ते ६‎ हरिपाठ, रात्री ८:३० ते १०:३०‎ हरि कीर्तन व हरिजागर होईल.‎

या प्रतिदिनी रात्री ८:३० ते‎ १०:३० या वेळेत पुढील प्रमाणे‎ कीर्तनाचे आयोजन केले आहे़.‎ दि. १७ रोजी लक्ष्मण महाराज‎ तकिक यांचे, दि. १८ रोजी राजे‎ भाऊ महाराज गवते, दि. १९‎ रोजी रामचंद्र महाराज जगताप,‎ दि. २० रोजी बबन महाराज‎ बहिरवाळ, दि. २१ रोजी‎ सोमनाथ महाराज कराळे, २२‎ डिसेंबर रोजी महंत लक्ष्मण‎ महाराज मेंगडे यांचे कीर्तन‎ होणार आहे.‎ शुक्रवार दि.२३ रोजी सप्ताहाची‎ सांगता महंत प्रेम मूर्ती शिवाजी‎ महाराज यांच्या काल्याच्या‎ कीर्तनाने सकाळी ११ ते दुपारी ०१‎ या वेळेत होईल. त्यानंतर लगेच‎ महाप्रसादाचे आयोजन केले‎ आहे. हरिनाम सप्ताहातील सर्व‎ कार्यक्रमांचा पंचक्रोशितील भाविक‎ -भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा‎ असे आवाहन करचुंडी येथील‎ सप्ताह संयोजकांच्या वतीने‎ करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...