आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताहा:अखंड हरिनाम सप्ताहा; भक्त व देवांना एका धाग्यात गुंफणारा धागा म्हणजे काला

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारकरी संप्रदायात देवाच्या नामाला जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्त्व किंवा त्यापेक्षाही अधिक काल्याच्या प्रसादाला आहे. अखंड हरिनाम सप्ताहात आपण देवाची भक्ती, नामस्मरण, श्नवण, संकिर्तन, सेवा मोठ्या हर्ष उल्हासात समर्पित करतो. या सर्व केलेल्या सेवेचा प्रसाद म्हणजेच काला होय. देव आणि भक्त यांना एका मजबूत धाग्यात गुंफण्याची किमया साधणारा हा काला वारकरी संप्रदायात श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन एकनाथ महाराज पुजारी यांनी केले.

पेठ बीड भागातील संस्थान श्री विठ्ठल मंदिर येथे प्रतिवार्षिक अखंड हरिनाम महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. यानिमित्ताने परिसरात दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. यादरम्यान, काल्याच्या कीर्तनात बोलताना एकनाथ महाराज पुजारी म्हणाले, सप्ताहातील सांगतेला एकमेकांच्या मुखात आपण मोठ्या प्रेमाने काल्याचा प्रसाद भरवतो. निखळ प्रेमभावाचा, अविट गोडी असलेला आणि देवाच्या नामाने, भक्तीभावाने जो घास एकमेकांना भरवतो, त्यास काला म्हणतात. महाराष्ट्रातील संत महात्म्यांनी काल्याच्या प्रसादाचा महिमा आपल्या अभंगरुपी संत साहित्यातून सुंदर वर्णन केला आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांनी आपल्या विविध अभंगातून देवाचे नाम, रूप, भक्ती ही तर श्रेष्ठ आहे.

बातम्या आणखी आहेत...