आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड हरिनाम‎ सप्ताह:दत्त जयंतीनिमित्त घोगस‎ पारगाव येथे अखंड हरिनाम‎ सप्ताहाचे आयाेजन‎

शिरूरकासार‎5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री क्षेत्र कमांडलेश्वर संस्थान यांच्या‎ वतीने दत्त जयंती निमित्त अखंड‎ हरिनाम सप्ताहाचे आयोजन‎ तालुक्यातील घोगस पारगाव येथे‎ करण्यात आले आहे. १ ते ८‎ डिसेंबरपर्यंत हा सप्ताह पार पडणार‎ आहे.‎

श्रीक्षेत्र भगवानगड संस्थानाच्या‎ पायथ्याशी असलेल्या घोगस‎ पारगाव येथे होणाऱ्या हरिनाम‎ सप्ताहात मोहन महाराज दराडे,‎ रामगिरी महाराज, नामदेव महाराज,‎ अतुल महाराज शास्त्री, स्वामी‎ जनार्दन महाराज, केशव महाराज‎ भगत शास्त्री, कैलास महाराज दराडे‎ यांची कीर्तन सेवा लाभणार असून‎ वेदांताचार्य स्वामी विवेकानंद शास्त्री‎ यांचे काल्याच्या कीर्तन होईल.‎ कमंडलेश्वर संस्थानाचे मठाधिपती‎ शिवभक्ताचार्य आबा देव महाराज‎ दराडे यांनी आयोजन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...