आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडवणी तालुक्यातील साेन्नाखाेटा येथील ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पात गुरुवारी (२८ जुलै) एकूण १६.४० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८४.७२ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. सांडव्याद्वारे धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा अपेक्षित पाणीपातळीपर्यंत पोहोचल्यावर जलसंपदा विभागाच्या यंत्रणेमार्फत कु़ंडलिका नदीपात्रात पाणी सोडणार आहे.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा धरणाच्या ऊर्ध्व भागातील पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेनुसार धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकच्या अनुषंगाने ठरवण्यात येईल. त्यामुळे पुढील काळात कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता भासू शकते. ही परिस्थिती लक्षात घेता वडवणी आणि धारूर तालुक्यातील नदीपात्राजवळील गावातील व आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरे, वीज मोटारी तत्काळ काढून घ्याव्यात असे आवाहन करत नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.