आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यस्मरण:बीड शहरातील पुतळा परिसरातील अभिवादनासाठी मान्यवरांची दिवसभर रीघ; शाळा, महाविद्यालयांतही राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला उजाळा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्याख्यान-आरोग्य शिबिरांसह विविध उपक्रमांनी राजमाता अहिल्यादेवींना वंदन, बीड शहरातील रॅलीने वेधले लक्ष

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बीड शहरात रॅली काढून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले. तसेच शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, राजकीय पक्ष-संघटनांच्या कार्यालयांतही अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा देण्यात आला. माजलगाव शहरातील राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर चौकामध्ये पिवळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रमाता लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रा. प्रकाशराव गवते, माजी उपाध्यक्ष तुकाराम येवले, रासपचे कल्याणराव गवते, व्याख्याते बाळासाहेब सोनसळे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास नेमाने, युवा मल्हार सेना तालुका अध्यक्ष संतोष देवकते, सराफ संघटनेचे उपाध्यक्ष नारायण सातपुते, भागवत गायकवाड, अविनाश कांडुरे, उपसरपंच राज अर्जुन, खानापूरचे सरपंच शंकर आबुज, विशाल देवकते, मुक्तिराम आबुज, राजरतन डोंगरे, आप्पासाहेब तायडे, विनायक सरवदे, पंकजकुमार साळवे प्रभाकर साळवे, हनुमान सरवदे, शिवाजी आबुज, अशोक मस्के आदींची उपस्थिती होती. केएसपी विद्यालय, बीड

बीड शहरातील केएसपी विद्यालयात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अंजली शेळके, प्रभारी मुख्याध्यापक जगदीश शिंदे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शस्त्रावर प्रावीण्य मिळवलेच होते. यासोबतच त्यांनी शास्त्र देखील जपले. समस्त भारतीयांना आपली संस्कृती जपा, संस्कृती वाढवा असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थिती होती.

केएसके महाविद्यालय
बीड येथील केएसके कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रभारी प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी प्रतिमेचे पूजन करून केले.

अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेले आहे, असे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमाकांत जगताप यांनी केले. या वेळी डॉ. सतीश माऊलगे, उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, डॉ. प्रज्ञा महेशमाळकर, डॉ.अनिल शेळके, डॉ. प्रेमचंद सिरसट व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी हजर होते.

काँग्रेस, बीड तालुका
बीड येथे काँग्रेसच्या बीड तालुका कार्यकारिणीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, युवक तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख बबलू, जुबेर काझी, श्रीमंतराव घोडके, योगेश कुंभारकर, कृष्णा साळुंके, बाळासाहेब भंडारी आदी पदाधिकारी हजर होते.

वकील संघ, बीड
बीड येथील जिल्हा वकील संघाच्या कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड.राहुल साळवे, सचिव अॅड.भालचंद्र गोस्वामी, अॅड. रणजित सोनवणे, ग्रंथपाल सचिव अॅड. किशोर कसबे, अॅड.नामदेव साबळे, अॅड. महादेव तुपे, अॅड. सुरेश वडमारे, अॅड. विलास जोशी यांच्यासह वकील संघ सदस्यांची उपस्थित होती.

गढी, ता. गेवराई
गेवराई तालुक्यातील गढी येथील आर. के. कॉम्प्युटर्स या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच राम जाधव, ग्रामपंचायत सदस्य विनोद शिंदे, तुकाराम खरात, बाळासाहेब मदने, उत्तम शिंदे, दत्ता मोटे, अर्जुन शेंडगे, अमोल भावले, सुदाम मोटे, कल्याण भावले, विनोद ढाकणे, कचरू मोटे, बाळू मोटे, गणेश चोरमले, विलास चोरमोले, संभाजी चोरमोले, विकास मोटे, संजय चोरमोले, कृष्णा मोटे, बिभीषण करे, दादा करे, कैलास मोटे, मंजेश शिंदे, शिवराम शिंदे, अशोक शिंदे, जनार्दन शिंदे, राजेंद्र शिंदे आदी मान्यवर हजर होते.

गढी, ता. गेवराई
गेवराई तालुक्यातील गढी येथील आर. के. कॉम्प्युटर्स या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच राम जाधव, ग्रामपंचायत सदस्य विनोद शिंदे, तुकाराम खरात, बाळासाहेब मदने, उत्तम शिंदे, दत्ता मोटे, अर्जुन शेंडगे, अमोल भावले, सुदाम मोटे, कल्याण भावले, विनोद ढाकणे, कचरू मोटे, बाळू मोटे, गणेश चोरमले, विलास चोरमोले, संभाजी चोरमोले, विकास मोटे, संजय चोरमोले, कृष्णा मोटे, बिबीशन करे, दादा करे, कैलास मोटे, मंजेश शिंदे, शिवराम शिंदे, अशोक शिंदे, जनार्दन शिंदे, राजेंद्र शिंदे आदी मान्यवर हजर होते.

बलभीम महाविद्यालय
बीड येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. महादेव साखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. महारुद्र जगताप, डाॅ. बी. डी. जाधवर, डाॅ. शैलेश आकुलवार, प्रा. सुहास काळे, प्रबंधक पी.पी. डावकर, कार्यालय अधीक्षक किसन सागडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

लिंबगाव, ता. अंबाजोगाई
अंबाजोगाई तालुक्यातील मौजे लिंबगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली. यावेळी माजी सरपंच धर्मराज धुमाळ, उपसरपंच निलेश धुमाळ, ग्रा.पं. सदस्य गोविंद अंबेकर, माणिक कोकरे, पांडुरंग आडसूळ, बब्रुवान कोकरे, शहाजी कोकरे, तातेराव कोकरे, अमृत आडसूळ, विश्वनाथ कोकरे, महादेव धुमाळ आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणेही पार पडली.

धानोरा, ता. अंबाजोगाई
धानोरा (बु.) येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बालासाहेब दोडतले, युवा मल्हार सेना बीड जिल्हाध्यक्ष गोविंद शिंपले, दत्ताभाऊ घुगे, समतादूत व्यंकटेश जोशी, सरपंच भगवान चिवडे, उपसरपंच मेघराज सोमवंशी, आबासाहेब पांडे, सुधाकर काळुंके, रवी सोमवंशी, युवराज चिवडे, अर्जुन चिवडे, सुशील चिवडे, विकास चिवडे, आदिनाथ चिवडे, अमोल चिवडे, प्रमोद चिवडे, प्रशांत चिवडे, नितीन तारडे आदींची उपस्थिती होती.

पिंपळवंडी, ता. पाटोदा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार, चेअरमन सुदाम मोरे, शिवाजी पवार, शिवसेना तालुका उपप्रमुख अशोक पवार, संजय पवार, पत्रकार बबनराव उकांडे, भाऊसाहेब पवार, सतीश सातपुते, शिवाजी पवार, मधुकर पवार, नामदेव शहाणे, अश्रुबा जरे, सुभाष पवार, अमोल दगडे आदींची उपस्थिती होती.

अहिल्यामातेचा जयघोष
बीड शहरात बानाई महिला सेवाभावी संस्था आणि अहिल्या महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अंबिका चौक ते अहिल्यादेवी होळकर पुतळ्यापर्यंत महिलांची भव्य रॅली काढून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. या वेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

स्त्रीशक्तीचे स्फूर्तिस्थान
लोकमाता अहिल्याबाई होळकर या हिंदुस्थानच्या व स्त्रीशक्तीचे स्फूर्तिस्थान आहेत, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी यांनी काढले. अंबाजेागाई येथे लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेत ते बोलत होते. याप्रसंगी किशोर परदेशी, सुनील व्यवहारे, धम्मा सरवदे, लोमटे, राणा चव्हाण, गोविंद पोतंगले, भारत जोगदंड यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...