आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा;  इटलीमध्ये होणाऱ्या कराटेच्या स्पर्धेसाठी 11 खेळाडूंची निवड

माजलगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत माजलगावच्या १२ खेळाडूंची इटली येथे हाेणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुंबई येथे ६ जून रोजी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा पार पडल्या होत्या.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये पवन क्षीरसागर, आर्यन डोंगरे, आनंद राऊत, सार्थक डोंगरे, यशवंत सक्राते, राजवीर जाधव, सुमित सुतार, पार्थ भुतडा, सतिश जाधव, सुशिलकुमार गोबरे, आदित्य राजेभोसले, मयुर दिक्षित या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. चंद्रमनी डोंगरे यांचे मार्गदर्शन या खेळाडूंना मिळाले. यशस्वी खेळाडूंचे आ. प्रकाश सोळंके, बाबुराव पोटभरे, मुंबई बाजार समिती सभापती अशोक डक, जि प सभापती जयसिंह सोळंके, दयानंद स्वामी, विश्वंभर थावरे, कचरू खळगे, डॉ.चव्हाण, जयदत्त नरवडे, तुकाराम येवले, राकेश साळवे, राजेश घोडे या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...