आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अंबाजोगाईत सर्वपक्षीय आत्मक्लेश आंदोलन

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या विरुद्ध एक दिवसीय सर्व पक्षीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यासंबंधीत सर्व समाज सम्मान सर्वपक्षीय कृती समिती मार्फत शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई येथे बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते ठरल्याप्रमाणे उपजिल्हाधिकारी कार्यालया समोरआत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यामध्ये अंबाजोगाईतील सर्व महापुरुषांना मानणाऱ्या नागरिकांना एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करत पदाधिकाऱ्यांनी आपले आपले सडेतोड विचार व्यक्त केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, शिवसेना शहर प्रमुख गजानन मूडेगावकर,एमआयएम मराठवाडा प्रवक्ते शेख रमीज सर, शहर प्रमुख हिफाजत पठाण, टिपू सुलतान जयंती समितीचे अध्यक्ष जहाँगीर पठाण, मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुनील जगताप, राष्ट्रवादीचे तालुका प्रवक्ते बालाजी शेरेकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागचे उज्जैन बनसोडे, रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, रिपाई आंबेडकर गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पौळे, भारत मुक्ती मोर्चाच्या जयश्री तरकसे, लोकजनशक्ती पार्टी मराठवाडा प्रमुख राजेश वाहुळे, तालुकाध्यक्ष अमर वाघमारे, काँग्रेस आयचे असिफोद्दीन खतिब, युवा तालुकाध्यक्ष अमरदीप गायकवाड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...