आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोबत सदैव राहू‎

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई‎ तलवाडा येथील ग्रामीण पोलीस‎ ठाणे कायदा सुव्यवस्थेसोबतच‎ विविध समाजोपयोगी, प्रबोधनात्मक‎ कार्यक्रम राबवते. उल्लेखनीय‎ कामगिरी करणाऱ्या सोबत सदैव‎ राहू, असे प्रतिपादन एसडीपीओ‎ स्वप्निल राठोड यांनी केले.‎ तलवाडा येथे आयोजित‎ कार्यक्रमात ते बोलत होते.‎ तालुक्यातील विविध गावांतील ‎ ‎ सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या‎ गणेश मंडळांना याप्रसंगी‎ गौरविण्यात आले.

पुढे बोलताना‎ राठोड म्हणाले की तलवाडा‎ हद्दीतील सर्वच गणेश मंडळांनी ‎सामाजिक व विधायक उपक्रम‎ राबवून आदर्श निर्माण केला आहे.‎ अशा पद्धतीने भविष्यात पोलीसांना‎ सहकार्य करत राहावे. आम्ही‎ त्यांच्या सदैव सोबत राहु, असे‎ राठोड यांनी बोलतांना सांगितले,‎ तलवाडा गावकऱ्यांच्या वतीने‎ उपविभागीय पोलीस अधिकारी‎ स्वप्निल राठोड, पोलीस निरीक्षक‎ प्रताप नवघरे, उपनिरीक्षक‎ बाळासाहेब भवर यांचा सत्कार पार‎ पडला. यावेळी सरपंच विष्णु हात्ते,‎ माजी जि.प. सदस्य अॅड.सुरेश‎ हात्ते, माजी जि.प. सदस्य युवराज‎ डोंगरे हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...