आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:अमरनाथ कायद्याच्या कचाट्यातून तूर्त सुटले, पण चाैकशीच्या फेऱ्यात अडकले

माजलगाव2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धेश्वर डोनेशनप्रकरणी पोलिसांचे मवाळ धोरण व गुन्हा दाखल करतानाच गटशिक्षणाधिकारी यांचे आगे-पिछे झाले. त्यामुळे योग्य कलमे न लावली गेल्यामुळे अमरनाथ खुर्पे यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटता आले. हे खरे असले तरी आता सिद्धेश्वर संकुलात झालेल्या आर्थिक अनागोंदीच्या चौकशीसाठी पाचसदस्यीय समिती नेमली आहे. सत्यनारायण लोहिया या समितीचे अध्यक्ष असल्याने लवकरच खुर्पेचा अनागाेंदी कारभार समाेर येणार आहे.

सिद्धेश्वर प्रकरणात चोर सोडून संन्यासी बळी गेले. त्यांना गजाआड राहण्याची वेळ आली आहे. पण मुख्य आरोपी असलेल्या खुर्पेला कधी पोलिस गजाआड करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, खुर्पे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. मुळात गुन्हा दाखल करतानाच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आगे-पीछे धोरण अवलंबले, पण आ. सोळंके यांनी दट्ट्या लावल्यामुळे कुचकामी कलमे लावून गुन्हा दाखल झाला.‌ त्यातही पोलिसांनी मुख्य आरोपी शोधण्यात आळशी धोरण अवलंबले त्यामुळे खुर्पेला बराच वेळ मिळाला. याचा फायदा घेऊन अनेक पापे झाकली.

त्यातही अटकपूर्व जामीनच्या दरम्यान पोलिस व सरकारी वकील बाजू मांडण्यात कमालीचे फोल ठरल्याने खुर्पेला जमीन मिळाला खरा, पण संस्थांतर्गत हालचालींनी वेग घेतला. जुनेजाणते संघ कार्यकर्ते आणि संचालक मंडळाची बैठक या संदर्भात पार पडली. त्यात अत्यंत कडक सूर निघाला. संस्थेच्या बदनामीस कारणीभूत ठरलेल्या खुर्पेच्या संपूर्ण कारभाराची चौकशी अत्यंत शिस्तप्रिय असलेले सत्यनारायण लोहिया यांच्या अध्यक्षतेखालील आता करणार असल्याने नाथाची अनेक पापे आता बाहेर पडणार असल्याचा विश्वास सर्वसामान्य व पालकांमध्ये निर्माण झाला आहे. आ. प्रकाश सोळंके यांनीदेखील याप्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केल्याचे समजते.

खुर्पेची हकालपट्टी करा
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या अमरनाथ खुर्पेची संस्थेतून हकालपट्टी केल्याशिवाय माजलगावच्या सिद्धेश्वर संकुलाचे वातावरण पूर्वीसारखे शुद्ध होणार नाही. त्यामुळे त्याची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी अनेक पालक, प्रहारचे गोपाळ पैंजणे, संतोष जेथलिया, ओमप्रकाश मालपाणी आदींनी केली आहे.
-डॉ. हेमंत वैद्य, कार्यवाह, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था.

समितीचा अहवाल आठ-दहा दिवसांत येईल
खुर्पे प्रकरणामुळे संस्थेची मोठी बदनामी झाली असून प्रकरणात सत्यनारायनजी लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल आठ दहा दिवसांत येईल त्यानंतर खुर्पे यांच्यावर कडक कार्यवाही अवलंबण्यात येईल तसेच सिद्धेश्वर संकुलाच्या कारभाराचे चित्रही बदललेले असेल.

बातम्या आणखी आहेत...