आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यवाणी कार्यक्रमास:सत्यपालाची सत्यवाणीस‎ अंबाजाेगाईकरांचा प्रतिसाद‎

अंबाजोगाई‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय चर्मकार महासंघ‎ अंबाजोगाईच्या वतीने संत शिरोमणी‎ गुरू रविदास व संत कंकय्या‎ महाराज यांच्या जयंतीनिमित्त‎ प्रबोधनकार सत्यपाल महाराज‎ यांच्या ‘सत्यपालाची सत्यवाणी’ या‎ कार्यक्रमास अंबाजोगाईकरांचा‎ मोठा प्रतिसाद मिळाला.‎ वेणूताई चव्हाण महिला‎ महाविद्यालयाच्या प्रांगणात हा‎ कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे‎ अध्यक्षस्थानी एन.डी.शिंदे हे होते‎ तर उद्घाटक म्हणून राष्ट्रीय‎ चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष‎ माधवराव गायकवाड हजर होते.‎

यासह प्रमुख पाहुणे म्हणून‎ डॉ.राजेश इंगोले, माजी न्यायमूर्ती‎ तिडके, अॅड.अनंत जगतकर, पूनम‎ परदेशी, अॅड.शिवाजी कांबळे,‎ जयंती उत्सव अध्यक्ष विनोद भुईटे‎ उपस्थित होते. या कार्यक्रमाची‎ सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि‎ थोर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार‎ अर्पण करून करण्यात आली‎ .कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र‎ घोडके यांनी केले. सत्यपाल‎ महाराज म्हणाले, अंधश्रध्दा व‎ अंधविश्वास यांच्या पाठीमागे न‎ लागता वास्तविकता पडताळून‎ त्याकडे खुल्या नजरेने पाहायला‎ हवे. त्यासाठी महापुरुषांचे‎ जीवनचरित्र अभ्यासावे.

आजच्या‎ काळात वाचाल तर वाचाल आणि‎ शिकाल तर टिकाल हा खरा मुलमंत्र‎ आहे, असे त्यांनी सांगितले. संत‎ रविदास महाराज व संत कंकय्या‎ यांनी समाजवादी विचारांची पेरणी‎ केली. संत तुकाराम महाराज, संत‎ गाडगेबाबा, संत तुकडोजी यांचे‎ विचार सदैव आपल्या आठवणीत‎ ठेवून त्यावर आचरण करावे. सर्व‎ संतांनी व महापुरुषांनी माणसात देव‎ पाहिला. त्याुमळे आपणही‎ माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचे‎ आवाहन देखील सत्यपाल महाराज‎ यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय‎ समारोप एन.डी.शिंदे यांनी केला.‎ त्यानी गुरू रविदास व संत कंकय्या‎ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.‎ यावेळी अमोल कांबळे, महिपती‎ कांबळे, लिंबाजी खरटमोल, गोविंद‎ खरटमोल, जयसिंग कांबळे,‎ बालाजी परदेशी, अशोक कांबळे,‎ ज्योतिराम बनसोडे आदी हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...