आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधा:लग्नकार्यानिमित्त सुवासिनींसाठी आयोजित जेवणातून जेवणातून 50  महिलांना विषबाधा

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नकार्यानिमित्त सुवासिनींसाठी आयोजित जेवणातून जवळपास ५० महिलांना विषबाधा झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गीत्ता येथे मंगळवारी घडली. सर्व बाधित महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गीत्ता येथील तरुणाचा येत्या शुक्रवारी विवाह आहे. यानिमित्ताने सोमवारी (दि.०५) भावकीतील महिलांसाठी सुवासिनींचे जेवण आयोजित करण्यात आले होते. सोमवारी दुपारी गावातील जवळपास शंभर महिलांनी या कार्यक्रमात जेवण केले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातील काही महिलांना विषबाधेची लक्षणे दिसू लागली. दुपारनंतर बाधित महिलांची संख्या वाढल्याने त्यापैकी ३६ महिलांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर काहींवर खासगीत उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...