आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करुणा शर्मांना दिलासा:तब्बल 16 दिवसांनंतर करुणा शर्मा यांना जामीन मंजूर, 25 हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने केली सुटका

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करुणा शर्मा या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आलेल्या होत्या.

करुणा शर्मा या जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत होत्या. मात्र आता त्यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाने दिला. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची कोर्टाने सुटका केली आहे.

न्यायालयाने सांगितल्यानुसार, चार्जशीट दाखल होईपर्यंत शर्मा यांना परळी आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये येण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबर रोजी अटक झाली होती. तब्बल 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झालेली आहे. करुणा शर्मा यांच्यासह त्यांचे चालक अजय मोरे यांनाही जामीन मिळालेला आहे.

नेमके प्रकरण काय?
करुणा शर्मा या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आलेल्या होत्या. यावेळी एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ, तसेच प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली करुणा शर्मा यांना त्यांचा सहकारी अरुण मोरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...