आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अंबाजोगाईत उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारेंनी मांडले विचार

अंबाजोगाई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्री व सेवाभाव जोपासून समाजातील उपेक्षितांना न्याय द्यावा. याच कामातून सामाजिक जाणीव जपली जाते, असे प्रतिपादन लातुर येथील उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केले.

इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या पदग्रहण सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर अंबाजोगाई येथील शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मेघना मोहिते, सचिव अर्चना मुंदडा, माजी अध्यक्षा अंजली चरखा, पदाधिकारी उपाध्यक्ष सोनाली कर्नावट कोषाध्यक्ष सुरेखा सिरसाट, शिवकन्या पवार, आयएसो संगीता नावंदर, सुहासिनी मोदी उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना तृप्ती अंधारे म्हणाल्या की मनात दडलेल्या स्वप्न व इच्छांना इनरव्हील क्लबच्या माध्यमातून वाट मोकळी करून द्या. संवेदना बोथट न होऊ देता जिवंतपणे काम करा.समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आपले काम पोहोंचवा. बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी. एक चांगला पालक कसं होता येईल? हे सांगताना दूरदर्शन संच व मोबाईलचा स्क्रीनटाईम कमी कसा करता येईल. याकडे लक्ष द्यावे.आपलेच शब्द आपल्या मुलांना घडवत व बिघडवत असतात.यासाठी शब्द जपुन वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी बोलताना मुमताज पठाण म्हणाल्या की महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जोपासावा.या वेळी इनरव्हील क्लबच्या नूतन अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ झाला. माजी अध्यक्षा अंजली चरखा यांनी अहवाल सादर केला. सूत्रसंचालन स्वरूपा कुलकर्णी यांनी केले तर आभार शिवकन्या पवारांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...