आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:मुलाच्या प्रेमविवाहाचा राग; सासऱ्याने कुऱ्हाडीने केला सुनेचा निर्घृण खून, पत्नीलाही कुऱ्हाडीने मारहाण

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन महिन्यांपासून घरात सून, सासरा व मुलगा यांच्यात धुसफूस सुरू होती

पाच वर्षांपूर्वी मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलाने आपल्या सुनेच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. शीतल अजय लव्हारे (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता बालासाहेब लव्हारे याने सून शीतलच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात सासूही जखमी झाली. गंभीर जखमी शीतलचा मृत्यू झाला. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फरार सासऱ्याला पोलिसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला.

प्रेमविवाह केल्याचा मनात राग : मुलगा अजयने पाच वर्षांपूर्वी शीतलसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना ४ वर्षांची मुलगीही आहे. विरोध झुगारून अजयने विवाह केल्याचा राग बालासाहेबच्या मनात होता. याच रागातून त्याने हे कृत्य केले. लग्नापासून अजय बाहेरगावी राहत होता. लॉकडाऊननंतर तो गावाकडे परतला होता. अजयला पत्नीसह त्याच्या आईने घरात घेतल्याचा रागही बालासाहेबला होता.

पत्नीलाही कुऱ्हाडीने मारहाण : तीन महिन्यांपासून घरात सून, सासरा व मुलगा यांच्यात धुसफूस सुरू होती. आपला विरोध झुगारून पत्नीने मुलाला व सुनेला घरात घेतल्याच्या रागामुळे बालासाहेबने सुनेला जिवंत मारले तर आपल्या पत्नीलाही कुऱ्हाडीने वार करून जखमी केले, अशी माहिती बर्दापूर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी दिली.