आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थरार:अंबाजोगाईच्या कापड व्यापाऱ्याला पळवून नेऊन मारहाण, ५ लाखांची खंडणी घेतल्यानंतर सोडले

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थरार मॅनेजरने पैसे दिल्यावर केली सुटका, पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

अंबाजोगाई शहरातील कापड विक्रेत्यास खंडणीसाठी पळवून नेऊन मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून साडे पाच लाख रुपयांची खंडणी घेतली. याप्रकरणी अनोळखी पाच जणांवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी मंदिराच्या बाजूस असलेल्या श्रीहरी होलसेल साडी डेपोचे मालक भानुदास सुधाकर मोरे (३३, रा.अंबाजोगाई) याने त्यांच्या ओळखीचा येथील उमेश पोखरकर याला उधारीने साड्या दिल्या होत्या. ४ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास भानुदास मोरे याला उमेश पोखरकर (रा.अंबाजोगाई ) याने फोन करून शिवाजी चौकात बोलावून घेतल्यानंतर पोखरकर याने माझ्याकडे किती उधारी आहे. तो हिशेब काढून ठेवा असे सांगितले. दोघांचे बोलणे झाल्यानंतर भानुदास हा स्कूटीवर बसून घराकडे जाताना कदम यांच्या जुना पेट्रोल पंपापर्यंत गेले तेव्हा रात्री दहा वाजता भानुदासच्या पाठीमागून एक कार स्कूटीला चिकटून त्याच्या समोर आली. कारमधील ड्रायव्हरसह अनोळखी पाच जणांनी भानुदासला स्कूटीवरून बळजबरीने कारमध्ये बसवून अंबाजोगाई येथून केज मार्गे मांजरसुंबा व तेथून चौसाळा रोडवर अंदाजे १२ कि.मी. अंतरापर्यंत नेले. त्याला मारहाण करून २० लाखांची मागणी केली तेव्हा खंडणीखोरांनी तुझ्या मॅनेजरला फोन करून पैसे मागवून घे असे सांगितले. भानुदासने त्याचा मॅनेजर नारायण शिंदे यास फोन करून अपहरणाची माहिती देऊन पैशाची मागणी केली. त्यानंतर शिंदे यांनी याप्रकरणी उमेश पोखरकर यास फोन करून माहिती दिली. भानुदास व उमेश पोखरकर यांचे फोनवर बोलणे झाले.

भानुदास जवळ पैसे नसल्याने त्याने उमेशकडे साडेपाच लाख रुपये मागितले. तेव्हा उमेश हा पळवून नेणाऱ्या लोकांना फोनवर बाेलला. त्याने साडेपाच लाख रुपये घ्या आणि सोडून द्या, असे म्हणाला. त्यावेळी उमेशने पैसे कमी पडतात तुझ्याकडे पैसे आहेत का अशी विचारणा भानुदासकडे केली. भानुदासने त्याच्या फोन पेवरून २७ हजार रुपये व मॅनेजर राजेश मोरेकडून २० हजार रुपये उमेश पोखरकर याला दिले. भानुदास अनोळखी व्यक्तीसोबत चौसाळा रोडवरील कन्हैया हॉटेलवर थांबला.

दरम्यान, ५ जानेवारी २०२१ रोजी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास उमेश पोखरकर व त्याच्या सोबत अनोळखी दोन असे तिघे पैसे घेऊन भानुदासकडे आले व पोखरकर याने भानुदासला पळवून नेणाऱ्या लोकांजवळ त्याच्या जवळील बॅग देऊन भानुदासला आपल्याकडील वाहनात बसवले. त्यावेळी त्याला पळवून नेणाऱ्या पाचही लोकांनी जर पोलिसांत तक्रार दिलीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला खलास करून टाकू, अशी धमकी दिली. दरम्यान, भानुदास याने पळवून नेणाऱ्या कारचा नंबर पाहिला असता तो (एम एच १२ क्यूटी ३३९३) असा होता. नंतर भानुदास व उमेश आणि त्याच्या सोबतच्या दोन अनोळखी माणसांसोबत अंबाजोगाई येथे आला.

पैशांची परतफेड करेपर्यंत दिले तीन चेक
भानुदासने उमेशकडून त्याला सोडवण्यासाठी घेतलेले पैशांची परतफेड करेपर्यंत त्याच्या एचडीएफसी बँकेचे तीन चेक दिले. या आशयाची तक्रार भानुदास मोरे याने अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी पाच अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक बी. एन. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...