आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अंबाजोगाईत राष्ट्रवादी आपल्या दारी

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई शहरात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ झाला. राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, बबन लोमटे, हाजी महेमूद, संकेत मोदी, विलास सोनवणे, विजय लखेरा, महादेव आदमाने, दत्ता सरवदेंसह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अंबाजोगाई शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी यांच्या वतीने ‘राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या दारी, संपर्क व संवाद अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात शहरातील सदर बाजार परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधून करण्यात आली. हे अभियान सदर बाजार, मोची गल्ली, गांधीनगर, मिलिंदनगर, काळम पाटील गल्ली, बाराभाई गल्ली, रविवार पेठ या भागातील नागरिकांशी संवाद साधला. मुंडे यांनी प्रभागात झालेल्या विकासकामांबाबत माहिती सांगून काही उरलेली कामेदेखील लवकरच होतील, अशी आशा व्यक्त केली. या अभियानात शेख मोईन, मुनवर शेख, पंडित हुलगुंडे, डी. के. कांबळे, मोरेवाडीचे सरपंच औदुंबर मोरे, गोविंद पोतंगले, डॉ. राजेश इंगोले, संतोष शिनगारे, अशोक जेधे, सय्यद ताहेर, वाजेद खतीब, रमेश कदम, खलील जाफरी, जावेद गवळी, सोमनाथ धोत्रे आदींचा सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...