आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत राहणाऱ्या अंबाजोगाई येथील अभियंत्यासह त्याच्या पत्नीचा घरात संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. अमेरिकन माध्यमांनी त्यांच्या वृत्तात पती बालाजी रुद्रवारने पत्नी आरतीच्या पोटात चाकूने वार केल्याचे म्हटले आहे. तर बालाजीचे अंबाजोगाई येथील व्यापारी वडील भरत रुद्रवार यांनी माझा मुलगा व सून खूपच प्रेमळ होते. घडल्या प्रकारावर विश्वासच बसत नसून हा प्रकार घातपाताचा असण्याची शक्यता व्यक्त केली.
अमेरिकेतील काही स्थानिक वृत्तपत्रांनी सांगितले की, पोलिस अधिकाऱ्यांना अपार्टमेंटमध्ये बालाजी व आरती रुद्रवार हे दांपत्य मृतावस्थेत आढळले. अंबाजोगाई येथील बालाजीचे वडील भारत रुद्रवार यांनी सांगितले की, अमेरिकेतील स्थानिक पोलिसांनी गुरुवारी या घटनेविषयी त्यांना फोनवरून माहिती दिली आहे. मृत्यूच्या कारणाबद्दल अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. अमेरिकन पोलिसांनी शवविच्छेदनात गर्भवती असल्याचे म्हटले आहे. “आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्याबरोबर पुन्हा अमेरिकेला जाण्यासाठी दुसऱ्या सहलीची योजना आखत होतो. मुलगा आणि सून एक आनंदी कुटुंब होते आणि त्यांना प्रेमळ शेजारीही होते. घडल्या प्रकारावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. हा प्रकार घातपाताचा असण्याची शक्यता वाटते,’ असेही बालाजीचे वडील भारत रुद्रवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, रुद्रवार दांपत्याचे मृतदेह भारतात येण्यास किमान दहा दिवस लागतील, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी रुद्रवार यांना दिली. त्यांची नात विहा ही सध्या त्यांच्या मुलाच्या मित्राकडे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.