आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहनशीलतेचा अंत:आईला सतत त्रास देणाऱ्या मद्यपी पित्याचा मुलाकडून निर्घृण खून, कोयत्याने केले वार

केज15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूच्या नशेत नेहमी आईला त्रास देणाऱ्या पित्याचा मुलाने धारदार कोयत्याने तोंडावर व हातावर वार करत खून केला. त्यानंतर सोयाबीनच्या भुसकटात मृतदेह पुरून ठेवला. केज तालुक्यातील साळेगाव शिवारात १३ जून रोजी दुपारी ही घटना घडली. युसूफवडगाव पोलिसांत जाऊन त्याने स्वत:च याची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार समाेर आला. शिवाजी केशव हंकारे (५३, रा.जवळबन ता.केज ) असे खून झालेल्या पित्याचे तर पवनकुमार हंकारे (२७) असे खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

शिवाजी यांना पत्नी, दोन मुले, तीन मुली असून दोन मुलीचा विवाह झालेला आहे. त्यांचा माेठा मुलगा पवनकुमार हा पुण्याला कामाला असतो. त्याचाही विवाह झालेला आहे. त्याला तीन महिन्यांची मुलगी आहे. शिवाजी यांना दारूचे व्यसन हाेते. ते सतत आई व इतर कुटुंबीयांना त्रास देत हेाते. चार दिवसांपूर्वी दारूच्या नशेत शिवाजी पत्नीला मारत होते. शेजाऱ्यांनी भांडण सोडवले. त्यानंतर पत्नी धाकटा मुलगा व मुलीला घेऊन तांबवा येथील भावाकडे गेल्या. त्यानंतर पवनकुमारने वडिलांना फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला. पण उलट त्यालाच शिवीगाळ केल्याने तो १४ जूनला पहाटे पुण्याहून गावी आला. दुपारी वडिलांना साळेगाव शिवारातील सदाशिव पारखे यांच्या शेतात निर्मनुष्य ठिकाणी आणले. तेथे कोयत्याने वार करत शिवाजी यांना ठार मारले.

सोयाबीनच्या भुसकटातून मृतदेह काढला बाहेर
केजचे सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, एपीआय शंकर वाघमोडे, फौजदार राजेश पाटील, वैभव सारंग, जमादार उमेश आघाव, पोलिस नाईक अशोक नामदास, संतोष गित्ते, बाळासाहेब अंहकारे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पवनकुमारने वडिलांचा मृतदेह सोयाबीनच्या भूसकटातून काढून दाखवला.

बातम्या आणखी आहेत...