आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोपर्यंत आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत जात नाहीत. तोपर्यंत वंचित समाजाचे दैनंदिन प्रश्न आपण सोडवू शकत नाहीत.बाळासाहेबांच्य ा विचाराला माननारा मतदार वर्ग मोठा आहे. परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहचतच नाहीत. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आपण बांधणी करून तयारी केली पाहिजे. कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने तयारी करावी, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष अशोक हिंगे यांनी केले. आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी, पाटोदा, शिरुर या तिन्ही तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक धनगर जवळका या ठिकाणी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांचा सत्कार मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसगी जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर, जिल्हा उपाध्यक्ष गोरख झेंड, पुष्पा तुरुकमाने यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना बांधणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या नंदा भंडारे, माजी जिल्हा महासचिव सचिन मेघंडबर, पाटोदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आष्टी तालुकाध्यक्ष किरण आखाडे, शिरूर तालुकाध्यक्ष दिलीप माने, तसेच तालुका पदाधिकारी युवक आघाडीचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.